Breaking

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

*रुकडी मधील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महात्मा गांधीजींचे विचार या विषयावरील व्याख्यान संपन्न*


प्राचार्य डॉ. महेंद्र कदम


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


रुकडी :  महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेचा उदय झाला असून शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची जवळून ओळख व्हावी, या हेतूने ग्रामीण भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमाबरोबरच निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. स्वच्छतेचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्वतःपासून स्वच्छतेला सुरुवात करणारे महात्मा गांधीजी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. अहिंसा, शांतता व सत्याग्रह हे प्राचीन भारतीयांचे विचार संपूर्ण जगात पोहचविण्याचे काम गांधीजींनी केले आहे. महात्मा गांधीजी हे सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे लोकनेते होते असे मत विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी जि. सोलापूर येथील प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि महात्मा गांधीजींचे विचार या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

        अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे होते.स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे यांनी केले.अध्यक्षीय भाषणात प्र-प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजन मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे जीवन समजावून घेतले पाहिजे, मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या  ब्रीद वाक्याप्रमाणे महात्मा गांधीजींनी लोकांच्या कल्याणासाठी काम केले. 

    या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.मुकुंद हळदकर यांनी केले. कार्यक्रमाचे मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालन डॉ.अशोक पाटील यांनी केले. ऑनलाइन संपन्न झालेल्या या व्याख्यानात विद्यार्थी आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

        सदर कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा