रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील श्री. दिपक संतोषकुमार सुतार बी.कॉम. भाग दोन आणि श्री.तौफिक महंमद पेंढारी बी.ए.भाग दोन या विद्यार्थ्यांनी नुकतेच वर्धा येथे संपन्न झालेल्या १९ व्या राज्यस्तरीय सिनियर वुशु या अजिक्यपद स्पर्धेत तावलु या प्रकारात यश संपादन केले.श्री.दिपक सुतार यांनी या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक सिल्व्हर पदक आणि श्री. तौफिक पेंढारी यांनी या स्पर्धेत एक सुवर्ण व एक सिल्व्हर पदक मिळविलेे आहे.
दिपक सुतार |
तौफिक पेंढारी |
या दोघांची चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु अजिक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना श्री.अविनाश पाटील आणि श्री.सतिश वडणगेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार डाॕ.निवेदिता माने, सचिव खासदार श्री.धैर्यशील माने, महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डाॕ.प्रशांत कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक श्री.भाऊसाहेब वडार यांचे प्रोत्साहन मिळाले.महाविद्यालयाच्या वतीने श्री.सुतार व श्री. पेंढारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा