Photo source-Loksatta |
आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. बीजेपी प्रवक्ते मात्र हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचा आरोप करत आहेत.
मात्र, केरळमधील पीटर म्यालीपराम्बिल हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी याबाबत थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हा फोटो हटवण्याची मागणी केली आहे. सरकारी दवाखान्याात लस उपलब्धध नसल्याने खाजगीीी दवाखान्यातून मी स्वतः पैसे खर्च करुन लस घेतली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर फोटो छापून श्रेय घेण्याचा मोदींना कोणताही अधिकार नाही, असं मत त्यांनी मांडलंय.
मोदींचा प्रमाणपत्रावरिल फोटो म्हणजे त्यांच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे, असंही म्हटलंय. पीटर हे आरटीआय कार्यकर्तेेे आहेत.
सोबतच याचिका कर्त्याने अमेरिका, इंडोनेशिया, इस्राईल, कुवेत, फ्रांस आणि जर्मनी या देशांच्या लसीकरण प्रमाणपत्राची प्रत न्यायालयासमोर सादर करत प्रमाणपत्रावर पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्षांचे फोटो नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. हे केवळ एखाद्या व्यक्तीने लसीकरण घेतलं की नाही याची खातरजमा करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा