Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महाविकास आघाडीचे माफिया म्हणून विश्वास नांगरे पाटील काम करतात; त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे : किरीट सोमय्या

 

किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई  : किरीट सोमय्या हे  भ्रष्टाचाराचे आरोप करणारे  नेते आहेत अशा प्रकारची प्रतिमा तयार झालीआहे. गेले काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ आणि संजय राऊत या नेत्यांवर सोमय्यांनी आरोप केले आहेत.

     आता मात्र किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा थेट पोलिसांकडे वळविला आहे, यात त्यांनी सह पोलिस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच निशाना साधला आहे, दिल्लीत पत्रकार परिषदेत सोमय्यांनी हे आरोप केले आहेत, सोमय्यांच्या या आरोपांची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

       "विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं." असा दावा सोमय्या यांनी TV9 मराठीसोबत बोलताना केला आहे.

     "नांगरे पाटलांच्या विरोधातील पुरावे माझ्याकडे आहेत. मला नजर कैदेत ठेवण्याची ऑर्डर नसल्याचं माहीत होतं तर नांगरे पाटलांनी मुलुंड पोलिसांवर अॅक्शन का घेतली नाही? नांगरे पाटलांना गृहमंत्री आश्वासन देत होते तर त्यांनी तसं सांगाव," असा देखील आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

       किरीट सोमय्यांनी यांनी पोलीस अधिकाऱ्यावर केलेला हा आरोप धक्कादायक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा