दीपक शेडबाळे व सचिन कांबळे यांना निवडीचे पत्र देताना |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रशेखर आजादजी यांच्या नेतृत्वाखाली प्रा.आयु. दिपक हिरानंद शेडशाळे व सचिन बाळू कांबळे हे भीम आर्मी या सामाजिक संघटनेमध्ये गेली अनेक वर्षापासून समाजातील वंचित तसेच तळागाळातील इतर घटकांच्या न्याय हक्कासाठी अविरतपणे झटकण्याचे काम करीत आहेत. तसेच उदारमतवादी भावनेने तरुण वर्गाला उदयोजक होण्याकरीता वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
दीपक शेडबाळे, सामाजिक कार्यकर्ते |
त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा व दखल घेऊन मा. आयु दिपक हिरानद शेडबाळे यांची निवड आजाद समाज पार्टी (संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण ) या पक्षामध्ये कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष या पदी निवड करण्यात आली. तसेच मा. आयु. सचिन बाळू कांबळे यांची शिरोळ तालुका अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली. सदर निवड मा.पॅथर राहूल एम्. प्रधान (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांचे नेतृत्वाखाली व प्रदेश प्रवक्ते मा. आयु. फिरोज मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. संतोष आठवले साहेब यांनी निवड केली. सदर निवडीस मा. समीर विजापूर कोल्हापूर जिल्हा संघटक, जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास लाड, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज मुजावर यांचे सहकार्य लाभले.
सचिन कांबळे |
त्यांच्या या निवडीने वंचित घटकासाठी सदैव काम करणाऱ्या या लढवय्या शिलेदारांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा