कोल्हापूरात व्यापाराला १० लाखाला फसविले |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरात सातत्याने फसवणुकीचे गुन्हे घडत असून अशाच एक फसवणुकीचलचा गुन्हा समोर आला आहे.हलदीराम फूडस् लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीच्या उत्पादनांची डिस्ट्रिब्युटरशीप देत आहे, असं सांगून विश्वास संपादन केल्यानंतर कोल्हापुरातील धान्य व्यापाऱ्याला एका भामट्याने जवळपास १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. संबधित व्यापाऱ्याने नेट बँकिंगवर व्यवहार केला असून शाहूपुरी पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. मार्केट यार्ड येथील धान्य व्यापारी प्रकाशलाल मोहनलाल माखिजानी (वय ५०, रा. कारंडे मळा, कदमवाडी ) यांचे केमसन्स ट्रेडर्स हे धान्य विक्रीचे होलसेल दुकान आहे. त्यांना एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून हलदीराम फूडस लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीतून बोलत आहे, असं सांगितले. कंपनी आपणास डिस्ट्रिब्युटरशीप देत असून त्यांनी माखीजानी यांचा विश्वास संपादन केला.
या घटनेने कोल्हापूरात पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हामध्ये वाढ झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा