पोलंड येथील व्रोस्लावमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ (ISSF) प्रेसिडेंट चषक स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने २५ मीटर पिस्टल प्रकारात ३१ गुण मिळवत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
२५ मीटर पिस्टल प्रकारात राही सरनोबत ने ही चंदेरी कामगिरी केली आहे. सुवर्णपदक मिळवण्यासाठी अवघ्या दोन गुणांची कमतरता झाली.जर्मनीच्या डोरीन वेन्नेकॅम्प हिने ३३ गुणासह सुवर्ण पदकावर नाव कोरले. पिस्तुलमध्ये बिघाड झाल्यामुळे तिला हा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
भारताच्या मनु भाकेरने दुहेरी प्रकारात सुवर्णपदक पटकावले परंतु वैयक्तिक स्पर्धेत चांगली कामगिरी दाखवता आली नाही.तिला फक्त १७ गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा