मा. उद्धवजी ठाकरे |
राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्यावर येत्या दोन तीन दिवसांत शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मानेच्या स्नायूवेदनांचा त्रास होत असल्याने त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून ही शस्त्रक्रिया लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीच्या अगोदर काही दिवस उद्धव ठाकरे यांना स्नायूवेदनेचा त्रास होत होता. यामुळे त्यांचे काही नियोजित कार्यक्रमसुद्धा रद्द करण्याची वेळ आली होती. अखेर वेदना असह्य झाल्यानंतर रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांची रिलायन्स फाउंडेशनच्या गिरगाव येथील रुग्णालयात तपासणी केली गेली. काही दिवसांपूर्वी ही तपासणी झाली असून त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप याबाबत मुख्यमंत्र्यांकडून किंवा कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा