Breaking

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

*बसवा टिव्हीचे विभाग प्रमुख रमेशकुमार मिठारे यांना बसव पुरस्काराने सन्मानित*

 

रमेशकुमार मिठारे बसव पुरस्काराने सन्मानित


प्रा. अक्षय माने  :  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


    अकिवाट (जि.कोल्हापूर) येथील रमेशकुमार मिठारे यांनी  बहुजन समाजाला सोबत घेऊन आपल्या गावातील बसवेश्वर नगर परिसरातील  पुरातन बसवान  मंदिराचे जिर्णोद्धार करून येथील अंधारमय लोकांना वीज कनेक्शन मिळवून  प्रकाशमय व निसर्ग रम्य  परिसर केला व परिसराचे बसवेश्वर नगर या नावाने परिचित केले.लिंगायत समाजातील १०वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम तालुका स्तरावर आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात व समाजातील कार्यकर्त्यांना पुढे करून मोफत वधुवर मेळाव्याचे आयोजन करतात असे अनेक  घडामोडी बसवा टिव्ही मराठी  युट्यूब या चॅनल च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ते निस्वार्थी पणे करत असुन या चॅनलचे पच्छिम महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.याच बरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली,मिरज, कवठेमहांकाळ येथील झालेल्या लिंगायत धर्म मेळाव्याचे विशेष बातमी तयार करून ते समाजापर्यंत पोहोचवली आहे.


       याचेच औचित्य साधून श्री.गुरुमुर्ती रूद्रपशुपती लिंगायत मठ,मिरज या मठात रमेशकुमार मिठारे यांना बसव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरु श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी होते.तर श्री गुरुमूर्ती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी (31 वे मठाधिपती केज सोलापूर), श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती उर्फ विनय कुमार महास्वामीजी (मिरज), श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी मासोलीकर महाराज (मासोली मठ, कराड, श्री मारलेश्वर, कोकण) व श्री महादेव महाराज महास्वामीजी (हिंगणगाव, कवठेमंकाळ) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा.भिमराव पाटील सर (लातूर) सुदर्शन बिराजदार (लातूर), बसवराज कनजे (पुणे),  सुहास मजती (मिरज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर हेवी इंडस्ट्रीजचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी, आरटीओ शिवानी सगरे, डॉक्टर कपिलेश्वर गुळभिले व वेदिका हारगे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लिंगायत धर्म प्रसारक सुरेश शेटे (वाळवा), महादेव तेली (डफळापुर), यांना ही बसव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास मठाचे चेअरमन महादेव चिवटे, व्हाईस चेअरमन प्रदीप वाले, सचिव गणेश नकाते, संचालक महादेव माळी, कार्यवाह श्रीकांत महाजन, उत्तम तोडकर, , मनोहर कुरणे, कैलास खलीपे तसेच बसवा टिव्ही मराठी चे सांगली शहर प्रतिनिधी रावसाहेब बालीगड्डे , चिकोडी तालुका प्रतिनिधी शितल कुडचे आदीसह लिगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा