Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

*कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला फक्त औपचारिकता राहिली*

  

पालकमंत्री सतेज पाटील


प्रविणकुमार माने : उपसंपादक


कोल्हापूर : विधान परिषदेची निवडणूक म्हटली की ‘पाटील-महाडिक यांच्यातील चुरशीची लढाई लक्षात येते. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यात  काटे की टक्कर होणार होती अशा प्रकारचे चित्र विधानपरिषद क्षेत्रात होती. गेल्या वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विधानपरिषदेत एंट्री केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात लढतीमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. 

        पण भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे अर्ज माघारीसाठी कोल्हापुरातील महाडिक कुटुंबाला भाजपने दिल्लीहून फोन केला होता. त्यामुळे अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज  माघार घेणार असल्याचे निश्‍चित झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा