मा. गजानन पळसे प्र.संचालक |
प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टो, / नोव्हें २०२१ हिवाळी सत्रातील परीक्षेचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी एका संदर्भीय पत्रानुसार तारखा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालय / मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ अधिविभाग स्तरावर विद्यार्थ्यांच्याकडून परीक्षा अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरू आहे.मात्र कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अधिकार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टो/नोव्हें. २०२१ हिवाळी सत्रातील परीक्षांच्या विलंब व अतिविलंब शुल्कात १०० टक्के सवलत देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असल्याने परीक्षा शुल्कासोबत कोणत्याही विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क अथवा अतिविलंब शुल्क स्विकारण्यात येवू नये.
विद्यार्थ्यांच्या कडून विहित वेळेत परीक्षा अर्ज भरून घेवून महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये परीक्षा अर्जाच्या याद्या सादर करण्याबाबत संदर्भीय पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच सर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता परीक्षा शुल्कात विलंब व अतिविलंब सवलतीबाबतचे सदरचे परिपत्रक सर्व संबधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणण्याबाबतच्या सूचना देण्यात आले आहेत अशी माहिती दि.२६ नोव्हेंबर,२०२१ च्या जा.क्र. शिवाजी वि. / परीक्षक नियुक्ती / आरव्हीसी / 737 परिपत्रकाद्वारे मा.गजानन पळसे प्र. संचालक ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी दिली आहे.
तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या या विद्यार्थी हितार्थ घेतलेल्या निर्णयाचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा