शिवप्रतिष्ठान औरवाड मार्फत किल्ले बांधणी स्पर्धा 2021 |
*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थी दशेत वाढावा व नवीन पिढीला तो समजावा या साठी शिवप्रतिष्ठान औरवाड मार्फत किल्ले बांधणी स्पर्धा 2021 मध्ये सर्व सहभागी मुलाचे गुलाब फुल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले या मध्ये प्रत्यक्ष किल्ल्या ठिकाणी जाऊन बांधणी मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मुलाचे आभार व सन्मान करण्यात आले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
या स्पर्धेत समेद राजेंद्र नरदे, अथर्व प्रदीप रावण, रतन रणजित मंगसुळे, नमित उत्तम मंगसुळे, सोहंम गोधडे, अप्पू सुरवंशी, वेदांत अरुण रावण, वरद आवळेकर, कार्तिक आवळेकर, शेखर गावडे, अनिश गावडे, श्रेयस जंगम, इत्यादीनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी औरवाड गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री जयवंत मंगसुळे , निवास गावडे, वैभव जाधव, अभिजित आवळेकर, राहुल ऐनापुरे, प्रसाद कुलकर्णी, सनी मंगसुळे, विनायक घोरपडे, अनिल कोले, सुनील अणुजे , करण पट्टेकरी, रवींद्र शिंदे , प्रा.चिदानंद अळोळी हे सर्व उपस्थित होते
या समाजभिमुख व शिव विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा