प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील 'गुणवंत प्राचार्य पुरस्कार २०२१ हा 'सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने' यांना शिवाजी विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात आले. त्यांच्या या पुरस्काराने एकूणच शिक्षण क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
विविध उपक्रमात कौतुकास्पद सहभाग
डॉ. मोहन राजमाने यांनी कार्यशील प्राचार्य म्हणून महाविद्यालयात आजवर अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. या सेवा कालावधीत महाविद्यालयाप्रती आपली निष्ठा, कार्यतत्परता, उत्कृष्ट अध्यापन व प्रशासन विविध समित्यावर केलेले प्रतिनिधित्व तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमोल योगदान या प्रमुख बाबी विचारात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने सन २००६ पासून आजअखेर सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या महाविद्यालयाची गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यात मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रीभूत मानून त्यांनी महाविद्यालयाचा सर्वंकष विकास करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक अत्यंत प्रामाणिक व संवेदनशील प्राचार्य म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सुसज्ज व अत्याधुनिक इमारतीबरोबरच पदवी, पदव्युत्तर, एम. फिल., पीएच.डी या पारंपारिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थाच्या सर्वागीण प्रगतीला चालना देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, आधुनिक काळात व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता ओळखून कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांन नोकरीबरोबरच व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील A मानांकन CGPA 3.63 मिळवणारे पहिले महाविद्यालय असून ISO प्रमाणित असणारे हे महाविद्यालय सन २०१९ पासून स्वायत्त करण्यात प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांचे दूरदृष्टि योगदान आणि प्रचंड मेहनत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य अॅड. रवींद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्रि. डॉ. व्ही. एस. शिवणकर, सहसचिव प्रिं. डॉ. प्रतिभा गायकवाड, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने हे विद्यार्थी व शिक्षक प्रिय असल्यामुळे त्यांच्या या यथोचित पुरस्काराने समस्त घटकांच्या मध्ये उत्साहाचं व आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा