Breaking

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे प्रा.मनोहर आप्पासाहेब कोरे यांना शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान ; मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्र जेऊर

 

प्रा.मनोहर कोरे यांना पीएच.डी. व मार्गदर्शक डॉ.राजेंद्र जेऊर

प्रा.अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


        प्रा.मनोहर कोरे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी.ची पदवी प्राप्त झाली. ते सध्या विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.  "Measurement of Human Development Index at micro level in Kolhapur District" या विषयावर डॉ. राजेंद्र जेऊर  यांच्या प्रामाणिक व उत्तम मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनास मान्यता देत शिवाजी विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली.

डॉ. राजेंद्र जेऊर पीएच.डी. मार्गदर्शक

      त्यांच्या या संशोधन कार्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून मिरज महाविद्यालय,मिरज येथील कार्यशील व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र डी जेऊर यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले.



     यापूर्वी त्यांनी श्री दत्त महाविद्यालय कुरुंदवाड, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, राजेंद्र महाविद्यालय खंडाळा येथे उपप्राचार्य म्हणून व महाराष्ट्रातील नामांकित अशा फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे अध्यापनाचे काम केलेले आहे. आज पर्यंत त्यांचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. विविध अर्थशास्त्रीय व शैक्षणिक विषयावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिलेली आहेत. मुळातच डॉ.मनोहर कोरे यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रवास हा विद्यार्थीदशेपासूनच आहे. सन १९९३ ला १२ वी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. बी.ए. च्या परीक्षेत ही ते महाविद्यालयात सर्वप्रथम होते. डॉ.कोरे यांनी सन २००५ मध्ये NET परीक्षा उत्तीर्ण,GDC&A व B.Ed. ही पदवी संपादन केली आहें. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी सेट/नेट व  स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत.कुरुंदवाड मधील विविध सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व विवेकवादी चळवळीशी त्यांचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे. महात्मा बसवन्ना सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे ते विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्या अनुषंगाने विविध समाज  उपयोगी कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. शिरोळ तालुक्यात एक प्रतिभावंत व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख आहे. असंख्य सामाजिक चळवळीशी नाळ जोडून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे व संवेदनशील प्राध्यापक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत.

                 शिरोळ तालुका महापूर आपत्ती २००५,२००६,२०१९ व २०२१ मध्ये केलेलं काम उल्लेखनीय असून शिरोळ महापूर आपत्ती २०२१ सकल विचार मंथन या माध्यमातून त्यांनी केलेले काम समाजोपयोगी व शासन धोरणाला उपयुक्त आहे. समाजवादी प्रबोधनी व जय हिंद डिजिटल न्यूजच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न ऐरणीवर मांडण्यासाठी व वंचित घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी शैक्षणिक चळवळीशी नाळ जोडून समाजवादी अध्यापक सभेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व मानवता जपण्याचे काम केलं.

     त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना बहुमोल असे मार्गदर्शन शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ज. फा. पाटील, प्रा.डॉ. वसंतराव जुगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तलुळे, प्रा.डॉ.पी.एस.कांबळे, प्रा.डॉ.विजय ककडे ,प्रा.डॉ. महादेव देशमुख, प्रा.डॉ.सौ.विद्या कट्टी  ,प्रा.डॉ.सुभाष कोंबडे,प्रा.डॉ.शशिकांत पंचगले, प्राचार्य बी.एस.काळे, प्रा.डी.जी. धट ,फर्ग्युसन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सौ.निर्मल भालेराव  व डॉ.सौ.शर्मिष्ठा मतकर,प्रा.डॉ.प्रभाकर माने, विलिंग्डन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

         तसेच त्यांच्या यशामध्ये त्यांच्या मातोश्री श्रीमती गौराबाई कोरे,सुविद्य पत्नी सौ.मेघाराणी कोरे, त्यांचे बंधू  डीवायएसपी श्री.विशाल कोरे यांचं विशेष प्रोत्साहन लाभले.

     त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र गौरव व कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा