मा.गजानन पळसे,प्रभारी संचालक |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ साधारणपणे जानेवारी / फेब्रुवारी, २०२२ दरम्यान नियोजित आहे. ऑक्टोबर, २०२० व एप्रिल, २०२१ सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यानी पदवी/पदविका, प्रमाणपत्र मिळण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने खाली दर्शविलेल्या मुदतीमध्ये विहित नमुन्यासह पदवी प्रमाणपत्र मागणीकरिता दीक्षांत अर्ज करणे आवश्यक आहे.
👉🏼 १) दि. २९ नोव्हेंबर, २०२१ ते दि. १८ डिसेंबर, २०२१ पर्यंत शुल्क रु.२५०/
👉🏼 २) दि. १९ डिसेंबर, २०२१ ते दि. २३ डिसेंबर, २०२१ पर्यंत शुल्क रु.३५०/
👉🏼 ३) दि. २४ डिसेंबर, २०२१ ते दि. २८ डिसेंबर, २०२१ पर्यंत शुल्क
रु.८५०/
👉🏼 ४) पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्याचे दीक्षांत अर्ज दि. ०५ जानेवारी, २०२२ पर्यंत रु. ८५०/- शुल्काने स्वीकारले जातील.
👉🏼 ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज Regular व Autonomus ऑप्शनमधून भरले आहेत त्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी.
👉🏼 सर्व बी.कॉम., बी.एड. व विधीशाखा (लॉ) परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी (PRN असणारे विद्यार्थी) संगणक प्रणालीमधून अर्ज भरताना आपला मुख्य विषय (Specialization) काळजीपूर्वक बिनचूक भरावा, यात चूक झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील.
👉🏼 सन २००२ पूर्वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (Manual option) तसेच एम. फिल / पीएच.डी विदयार्थी, व श्रेणीसुधार (Improvement) विद्यार्थी यांनी ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सुस्पष्ट अपलोड करावीत.
👉🏼 ऑनलाईन अर्ज करताना उपलब्ध माहितीमध्ये काही तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास, विद्यार्थ्याने त्याच्या Log in मधील Grievence ऑप्शनद्वारे नोंदवावी.तसेच अपुऱ्या अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही व त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. दीक्षांत समारंभ आयोजनाची तारीख यथावकाश कळविणेत येईल.
५८ व्या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने पदवी प्रमाणपत्र मागणी अर्जाबाबतचे सविस्तर निवेदन👇
www.unishivaji.ac.in / Web Apps ( Regular Convocation)
या विद्यापीठ संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे अशी माहिती दीक्षांत विभाग दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी च्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे श्री. गजानन पळसे प्र. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा