Breaking

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

भारतीय संविधानाने नागरिकांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाची भूमिका अधोरेखित केली : श्री.अमर बुल्ले

 

भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन करताना श्री अमर बुल्ले


*प्रा.अक्षय माने :कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


      रुकडीच्या राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व वक्ते श्री. अमर बुल्ले बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे होते.       

      मा. बुल्ले मार्गदर्शन करताना म्हणाले की, संविधानाने भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे तसेच या संविधानामुळे भारताने  एक राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर स्वतःचे वेगळे अस्तित्व  निर्माण  केले आहे.या देशातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीतीला अनुसरून भारतीय संविधान निर्माण केले आहे, घटना परिषदेतील सर्व सदस्यांचे स्मरण त्याच बरोबर मसूदा समितीचे अध्यक्ष डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आणि योगदान या संबंधी त्यांच्याप्रति  कृतज्ञता व्यक्त्त करणे, हा संविधान दिन साजरा करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश आहे.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डाॕ.अशोक पाटील यांनी केले.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे म्हणाले, देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. ही संविधानाची ताकद आहे, कोणत्याही व्यक्त्तीने आपल्यावर होणार अन्याय सहन करायचा नाही. हा संविधानाने आपणाला दिलेला अधिकार आहे.कसे रहावे, कसे राहू नये, व्यक्त्ती विकास अशा विविध बाबी समजावून घेण्यासाठी राज्यघटना माहीत असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

    या कार्यक्रमाचे आभार डाॕ.विजय देसाई यांनी मानले तर सूत्रसंचालन डाॕ. खंडेराव शिंदे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 टिप्पणी: