Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात बौध्दिक आदान-प्रदान होणे आवश्यक - प्राचार्य डॉ.अनिल पाटील.राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी आणि अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांच्यात सामंजस्य करार




      रुकडी ; (दि. २५ नोव्हेंबर) विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मध्ये बौध्दिक आदान-प्रदान होणे आज बदलत्या काळानुसार आवश्यक बानले आहे.अध्ययन, अध्यापन पध्दती,कला, क्रिडा व संस्कृती यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण करण्यासाठी सामंजस्य कराराचा उपयोग होईल असे मत प्राचार्य डाॕ.अनिल पाटील यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी आणि अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला, त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते  बोलत होते.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.प्रशांत कांबळे होते.स्वागत व प्रास्तविक डाॕ. उत्तम पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ.प्रशांत कांबळे म्हणाले या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने संयुक्त्तपणे काही कार्यक्रम व उपक्रम राबविता येतील त्याचा उपयोग दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना निश्चितपणे होईल.आभार डाॕ.त्रिशला कदम यांनी मानले तर सूत्रसंचालन डाॕ.विजय देसाई यांनी केले.या वेळी दोन्ही महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा