मा.प्रशासनाला निवेदन देताना विश्वास बालीघाटे व कार्यकर्ते |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
इचलकरंजी : शेतकऱ्यांचे पीक विमा बाबत विमा कंपन्यांच्या कडून होणारे टाळाटाळ प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्याचा इशारा युवा आघाडीचे विश्वास बालिघाटे याने निवेदनाद्वारे इचलकंजी प्रांतअधिकारी यांना दिले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे परंतु अनेक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असे निदर्शनास येत आहे. अत्यंत अयोग्य असून प्रशासनाने यामध्ये जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी त्या विमा कंपन्यांना आदेश देण्यात यावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा