Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

महाराष्ट्र सरकार - कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार रुपये; या असतील अटी,

संग्रहित छायाचित्र


      कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने विविध आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहेत. आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे घोषित केले आहे.

मात्र त्यासाठी या अटी असतील,

लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीर किंवा आरएटी चाचणी पॉझिटिव्ह असल्यास तो रुग्ण रुग्णालयात दाखल झालेला असला पाहिजे.क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये त्या व्यक्तीचे नाव  कोविड -१९ रुग्ण असे असले पाहिजे. त्या व्यक्तीचा उपचाररम्यान मृत्यू झाल्यास कोविड १९ मृत्यू असे समजण्यात येईल.


      संबधित कोविड १९ व्यक्तीचा मृत्यू चाचणीच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात क्लिनिकल डायग्नासिसच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाल्यास त्याला कोविड १९ चा रुग्ण समजण्यात येईल. संबधित व्यक्तीचा मृत्यू जरी रुग्णालयाबाहेर झाला तरी तो कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला असे ग्राह्य धरून त्या व्यक्तीचे नातेवाईक अनुदानासाठी पात्र ठरतील.

     संबधित कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ३० दिवसांनंतर मृत्यू झाल्यास तो कोरोनामृत्यू समजण्यात येईल, असे सरकारने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. संबधित व्यक्तीचे नातेवाईक हेही अनुदानासाठी पात्र ठरतील.

 

    अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वतः किंवा सेतू / ग्रामपंचायत मार्फत भरू शकता.

अर्ज करण्यासाठी या गोष्टी आवश्यक ;

हा अर्ज करताना अर्जदाराची स्वत:ची माहिती,आधार क्रमांक, बँकेचा तपशील, मृत व्यक्तीची संपूर्ण माहिती, मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला. अर्ज करणारी व्यक्तीच्या निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा