Breaking

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

धक्कादायक ! जयसिंगपूर येथे भरदिवसा अतिसंरक्षित अशा पिंगळा पक्ष्याला बंदुकीद्वारे गोळी घालून केले जखमी

 

संग्रहित छायाचित्र


✍🏼 मालोजीराव माने, कार्यकारी संपादक

      जयसिंगपूर (दि.१४ नोव्हें.) - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मार्केटयार्ड येथील गोडावूनच्या छताखाली बसलेल्या पिंगळा पक्ष्याला काही अज्ञात व्यक्तींनी छर्याच्या बंदुकीने गोळ्या मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंगळा ( spotted owlet ) हा शेडूल एक मधील संवर्धित पक्षी आहे.


अँनिमल सहारा फाउंडेशन चे सदस्य प्राणीमित्र सर्वदमन कुलकर्णी व अक्षय मगदूम



     घटनेची माहिती ऋषिकेश श्रीखंडे यांनी अँनिमल सहारा फाउंडेशन चे प्राणीमित्र अक्षय मगदूम यांना कळवली. तात्काळ प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी वनविभागाला कळवून घटनास्थळी धाव घेतली. प्राणीमित्र अक्षय मगदूम यांनी  तेथे पोहचून जखमी घुबडाला रेस्क्यू केले.त्याची पाहणी केली असता पिंगळाच्या उजव्या पंखाच्या मुळाशी गोळी लागली असल्याने त्याचा पंख निकामी झाला होता व बराचसा रक्तप्रवाह झाला होता. अँनिमल सहारा फाउंडेशन चे सदस्य अक्षय मगदूम व सर्वदमन कुलकर्णी यांनी त्या पक्षाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारास पाठवले आहे.

     विभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी सुमारे ११ छररे मारल्याचा खुणा दिसल्या व एक छर्याची मागची बाजू सापडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमार्फत अधिक तपास चालू आहे.


       घटनेची अधिक कसून चौकशी करून लवकरात लवकर आरोपींना पकडुन कठोर शिक्षा करण्याचा प्रयत्न करू. जर या घटनेबाबत कोणास अधिक माहिती असेल तर वनविभागाशी संपर्क साधावा, त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

 

              -वनक्षेत्रपाल रमेश कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा