Breaking

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

जयसिंगपुरात पालकमंत्री लसीकरण प्रोत्साहन योजनेचे काम प्रामाणिक व कार्यक्षमपणे चालू ; नागरिकांचा वाढता प्रतिसाद व नागरिकांकडून कौतुक

 

घरोघरी जाऊन लसीकरण करताना

मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


     शिरोळ तालुक्यात पालक मंत्री कोविड लसीकरण प्रोत्साहन योजना राबविण्या बाबतचे वरिष्ठांकडून आदेश मिळताच शिरोळ तालुक्यासह जयसिंगपूर शहरात अत्यंत उत्साहाने व कार्यक्षमपणे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

    शिरोळ तालुक्यातील सर्व गावातील १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे १००% लसीकरण होणेसाठी तसेच नियोजन करणेबाबत दिनांक ०८/११/२०२१ रोजी तहसिल कार्यालय शिरोळ येथे बैठक घेणेत आली. त्याअनुषंगाने जयसिंगपूर शहरातील शिल्लक लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे व लसीकरण केंद्रावर नेऊन लसीकरण पूर्ण करणे यासाठी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. पांडुरंग खटावकर व जयसिंगपुर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मा.टीना गवळी यांनी केलेल्या उत्तम नियोजनानुसार जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व जयसिंगपूर नगर परिषद यांच्या संयुक्तपणे जयसिंगपूर शहर 100% लसीकरण करण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे  व नगरपरिषद कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे सेवाभावी वृतीने व अत्यंत कर्तव्यदक्ष पणे दिलेली सामाजिक जबाबदारी व कर्तव्य पार पाडत आहेत.

      त्यांच्या एका टीम मध्ये एक पर्यवेक्षक व इतर नऊ जण अशा दहा जणांच्या ग्रुपकडून ही सेवा दिली जात आहे. सुरुवातीस रिक्षाच्या अनाउन्सिंगच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन व लसीकरण्यासाठी आवाहन केले जाते. त्यानंतर सदर आरोग्य व नगरपरिषदेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन लसीकरणा संदर्भातील वास्तव माहिती घेऊन लसीकरणा संदर्भात प्रबोधन करून जागेवर लसीकरणाचे डोस दिले जातात. सदरची मोहीम ही 'सुविधा हर घर दस्तक' या कार्यक्रमांतर्गत शहरातील शंभर टक्के लसीकरण २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व जण कटिबद्ध असल्याचे ते सांगतात.

      जयसिंगपूर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षिततेच्या काळजीपोटी खालील प्रमाणे ३ पथके नियुक्त करणेत आली आहेत. सदर प्रत्येक पथकात एक सुपरवायझर, इतर सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, लास टोचक, डाटा ऑपरेटर रिक्षा चालक अँम्ब्युलन्स व्हॅन या टीम मधील हे सर्व संबंधित कर्मचारी उत्तम पद्धतीने लसीकरण मोहिमेचे कार्य करीत आहेत. दिनांक ११ पासून तीन दिवसांमध्ये २८५ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत डोस दिले आहेत.

       जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,मा.तहसीलदार डॉ. सौ. अपर्णा मोरे -धुमाळ, मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.पाखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, डॉ.मोघे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

      जयसिंगपूर शहरातील लोकांची आरोग्याची काळजी घेण्यामध्ये शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तम नेतृत्व करणारे डॉ.पांडुरंग खटावकर प्रा.आ.केंद्र, जयसिंगपूर पर्यवेक्षक व आरोग्य सहाय्यक पी.एन. काळे, सुनील आलास्कर, डी.बी.गायकवाड, भाग्यश्री कांबळे, विशाल कांबळे, सचिन कांबळे,मंदा राजाराम शिंदे,मोहन पाटोळे,शिवाजी कांबळे,सिद्ध मंटाळे, बिना गणेश सारसर,साहिल लगीवाले,

स्वप्रील भोसले,अमोल आवळे,काशिवाई नंदू शिंत्रे,सुनिल पाटील, सावंता नाईक,कुमार कांबळे, कमल रमेश कांबळे, प्रमोद जाधव, गणेश भेंडवडे, दुर्योधन भंडारे ,जयश्री कांबळे, अनिल तराळ सचिन कुरणे, गणेश सोनवणे व अनिता हरीश मेहतर इत्यादी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावीत आहेत.

      सदर मोहिमेसाठी मिळणारा प्रतिसाद व कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी उत्तम सेवेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहरात शंभर टक्के लसीचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठता येईल अशी आशा आहे.

        लस न घेतलेल्या उर्वरित नागरिकांनीही सदर मोहीमेतील कर्मचार्‍यांना सहकार्य करून जयसिंगपूर शहर यशस्वीपणे कोरोना मुक्ती व आरोग्यदायी बनवण्यासाठी सदर घटकाकडून आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा