गोरख चव्हाण |
उमळवाड : दि.२० नोव्हें. : उमळवाड गावचे नागरिक सुहास तिवडे व भिकू कांबळे यांनी उमळवाड गावचे सरपंच गोरख चव्हाण यांच्या विरुद्ध अतिक्रमण केल्याच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर यांचेकडून प्राप्त झालेल्या आदेश पत्रानुसार सरपंच गोरख चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असून ते आता ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (१) (ज -३) व १६ अन्वये पदावर राहण्यास अनर्ह आहेत. त्यानुसार त्यांना आपले पद सोडावे लागणार आहे. सरपंच गोरख चव्हाण यांनी हा निर्णय मान्य नसून त्याविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशपत्र |
नेमके प्रकरण काय ?
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (१) (ज -३) व १६ अन्वये जर कोणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने शासकीय जागेत अतिक्रमण केल्यास तो गुन्हा असून त्याला पदावर राहता येत नाही.
स्वतः सरपंच गोरख चव्हाण यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या सामान्य गोरगरीब जनतेला ते त्रास देत असत, काबाडकष्ट करून पक्के घर बांधू इच्छित असणाऱ्या सामान्य नागरीकास अडवणूक करत असल्याचे तक्रारदार सुहास तिवडे , भिकू कांबळे व इब्राहिम जमादार यांनी म्हणले आहे.
याआधीचे तत्कालीन सरपंच कालवश आर. वाय. कांबळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवणुकीतून गोरख चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच बनले होते. अजुन एक दीड वर्षाचा कालावधी शिल्लक असताना ही घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा