प्राचार्य डॉ.पी आर शेवाळे यांचे दुःखद निधन |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : डी.डी. शिंदे सरकार महाविद्यालय, कोल्हापूरचे प्राचार्य तसेच शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट आणि अकँडेमिक कौन्सिलचे सदस्य मा.प्राचार्य डॉ.पी.आर. शेवाळे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या या आकस्मित जाण्याने दुःखाचा डोंगर पसरला असून डी.डी. शिंदे सरकार कॉलेजच्या व्यवस्थानपन समिती,समस्त प्राध्यापक विद्यार्थ्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या दुःखा ची बातमी समजताच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी.टी. शिर्के यांनी शोकभावना व्यक्त केल्या. ते म्हणाले प्राचार्य डॉ. पी.आर. शेवाळे यांच्या निधनामुळे उच्चशिक्षण क्षेत्रातील एक उमदे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याच्या भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे हे इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राबाहेरही आपल्या शैक्षणिक व संशोधकीय कार्याचा ठसा उमटविलेला होता. डी. डी. महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाबरोबरच ते गेल्या वर्षभराहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते. या भूमिकांतून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेमध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून केलेले काम व आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचा उल्लेख हा कौतुकास्पद आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात शोकसागर पसरला आहे.
जय हिंद न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेलच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा