कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप पाटील |
*प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे IQAC व मानसशास्त्र विभागाच्या वतीने मानसतज्ञ डॉ. प्रदिप पाटील यांचे "तिच्या मनाच्या तळाच्या गोष्टी" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. डी.बी.कर्णिक होते.
या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात प्रो. डॉ. विकास मिणचेकर यांनी कार्यक्रम आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा.डॉ. प्रदिप पाटील,(अध्यक्ष, आकार फौंडेशन,सांगली) यांच्या वतीने एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी प्रेम म्हणजे काय, मनाचे प्रकार, युवतींनी करीअरकडे लक्ष्य देताना घ्यावयाची काळजी त्याचबरोबर समुपदेशनाची गरज याविषयी जवळपास २ तास इतक्या कालावधीत विद्यार्थिनींचे सर्व पातळीवर प्रबोधन केले. त्यानंतर प्रश्न उत्तर तासामध्ये विचारलेले प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत विद्यार्थिनींचे शंकेचे उत्तम निरसन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी युवती व डिप्रेशन याविषयी सांगोपांग पद्धतीने मार्गदर्शन करीत उपस्थित विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. या कार्यक्रमातील पाहुण्याचे आभार मानले.
याचबरोबर मतदान जनजागृतीसाठी महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील प्रमाणपत्रांचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन IQAC समन्वयक डॉ. उमाजी पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहसंयोजक म्हणून हिंदी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, मराठी व इंग्रजी विभागाचे सहकारी प्राध्यापक लाभले. तसेच मुलींचे प्रश्नोत्तरामधील शंकासमाधानाचे सत्र डॉ. पंडित वाघमारे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. सलीम मुजावर कु. सुचेता साखळे व श्री. जितेंद्र उपाध्ये यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.अर्पिता चौगुले यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रशासकीय सेवकांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन अश्या मिश्र पध्दतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजयनाबाबत विद्यार्थिनींच्या कडून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा