Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

यश नावाचा बालक सापडला असून तो जयसिंगपूर पोलिस ठाण्यामध्ये सुरक्षित आहे : पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के

 

निलेश नावाचा हा बालक सापडला


मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक


   जयसिंगपूर : सदरचा बालक हा साधारणपणे तीन ते चार वर्षाचा आहे. त्याचं नाव यश असल्याचे तो सांगत असून आईचं नाव आरती आहे. इतर बाबी व कोठे राहतोस अशी विचारणा केली असता तो माहित नसल्याचे सांगत आहे.

        यश नामक हा मुलगा जयसिंगपूर शहरातील मालू हायस्कूल - नांदणी रोड लगत असणाऱ्या जयसिंगनगरमध्ये मिळून आला आहे. सध्या हा मुलगा जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.तरी आपण या बालकास त्याच्या आई-वडिलांपर्यंत तो सुरक्षित असल्याची व संपर्कासाठी माहिती पाठवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आवाहन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा