Breaking

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

जयसिंगपूरच्या घोडावत कन्या कॉलेजमध्ये कार्यशाळा ; बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार : मा.जी.एस.पवार यांनी केले प्रतिपादन

 

प्रमुख पाहुणे मा.जी.एस.पवार मार्गदर्शन करताना


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : दि. २३ डिसेंबर २०२१ लट्ठे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे IQAC, अर्थशास्त्र विभाग, स्पर्धा परीक्षा, करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल व संजय घोडावत बँकिंग ॲकॅडेमीच्या वतीने 'बँकिंग क्षेत्रातील रोजगारच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या विषयी बोलताना प्रमुख पाहुणे मा. जी एस. पवार यांनी बँकिंग क्षेत्रातील लाखच्यावर नोकरीच्या संधी विषयी सविस्तरपणे सांगितले.

       कन्या महाविद्यालयामध्ये संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र, अतिग्रेच्या वतीने मा. पवार यांनी बँकिंग क्षेत्रातील LIC,SBI, RB,BOI, व इन्शुरन्स अशा विविध संस्थेमध्ये कशाप्रकारे पाठयक्रम, परीक्षा व मुलाखत घेतली जाते. याविषयी सविस्तर चर्चा केली. याचबरोबर डॉ. सुर्यकांत कांबळे यांनी बँकिंग मध्ये IBPS अंतर्गत RBL,नाबार्ड, MPSC व UPSC विषयी चर्चा केली. मा. शहाजी बिरंगे व प्रतिक कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

                  कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यानी विद्यार्थिनींना बी.ए. व बी. कॉम शिकत असताना नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा तयारीची माहिती दिली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. संदीप रावळ यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एस. भिलवडे, प्रा. वर्षा शिंदे यांनी नियोजन केले. आभार डॉ. पंडीत वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा