Breaking

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मा.ना.भारतीताई पवार यांचे पृथ्वीराजसिंह यादव यांनी मानले आभार

 

पृथ्वीराजसिंह यादव व त्यांच्या टीमने घेतली भेट


ओंकार पाटील  : विशेष प्रतिनिधी


कागल : ३ महिन्या पूर्वी राज्यातील ५९७ व कोल्हापुर जिल्ह्यातील ३९आरोग्य सेविकांना उपकेंद्रातील प्रसुतीची संख्या कमी असलेचे दाखवुन व केंद्र सरकार कडुन कमी निधी आलेचे कारण देत त्यांना राज्य सरकारने कार्यमुक्त केले होते.तसेच कोल्हापुर जिल्ह्यातील ४७० समुदय आरोग्य अधिकाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतनही थकीत होते,या दोन्ही विषयांबद्दल मा.ओमप्रकाश शेटे(सह सचिव भारतीताई पवार) यांच्या मार्फत मा.ना.भारतीताई पवार यांच्या कडे *पृथ्वीराजसिंह यादव* यांनी पत्रव्यवहार करुन पाठ पुरावा केला होता.

        या नंतर ५९७ आरोग्य सेविकांना सेवेत सामावुन घेण्यात आले व समुदय आरोग्य अधिकाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन जमा झाले. याच पार्श्वभूमीवर आज कागल येथे समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविकां मार्फत भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापुर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी मा.ना.भारतीताई पवार यांची भेट घेउन आभार व्यक्त केले.तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      या वेळी शिरटी ग्रा.प सदस्य अभय गुरव,शिरोळचे माजी तंटामुक्त अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने,संजय कांबळे तसेच समुदय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका आदी  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा