माननीय न्यायमूर्ती अमेय गडकरी साहेब यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या उदघाटनाचा समारंभ हा मा.ना.उच्च न्यायालय मुंबई येथील मा.न्यायमूर्ती अमेय गडकरी यांच्या शुभ हस्ते तसेच मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती वृषाली जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर समारंभ हा जयसिंगपूर वकील संघटना, कुरूंदवाड वकील संघटना ,कोल्हापूर जिल्हा वकील संघटना, मा.अपर. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.कानडेसाहेब मा.दिवाणीन्यायाधीश व.स्तर गायकवाडसाहेब,मा.करभाजन साहेब, मा.जाधव मॅडम, मा.सहायक अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आलेला आहे.
उद्घाटन समारंभात मा. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हेदेखील उपस्थित होते. सदर समारंभासाठी जयसिंगपूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड टी.एफ. अत्तार, आय.ए.कांबळे साहेब,अॅड. जी.के.आंबेकर, यू.एम.कुलकर्णी साहेब, ए.एम.कुलकर्णी साहेब, एस.आर.कुलकर्णी, श्रेणीक चौगुले साहेब, डी.ए.दळवी,एस.जी.जगदाळे,बी.एस.माने, ए.बी.माने , आदि विधिज्ञांचे योगदान व परिश्रम लाभलेले आहे.तसेच जयसिंगपूर वकील संघटनेचे अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार अॅड.सतिश कांबळे साहेब, अॅड. कट्टी, अॅड. चादरे,अॅड बागडी, अॅड. पी.एस.माने आदि वकील मंडळीनी समारंभात सहकार्य केले.
सदर उदघाटन समारंभाची जयसिंगपूर शहरात आनंदाने चर्चा होऊन योगदान व परिश्रम दिलेल्या विधिज्ञांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा