प्राचार्य डॉ.कर्णिक यांच्या हस्ते डॉ.पांडुरंग पाटील यांचा सत्कार करताना |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : लट्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग व वाड:मय मंडळाच्या वतीने प्रो. डॉ. पांडूरंग पाटील (माजी विभागप्रमुख शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी व्याख्यानामध्ये हिंदी भाषेमधील रोजगाराच्या अनेक संधी विषयी विस्तृत विवेचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक होते.
महाविद्यालयामध्ये प्रो. डॉ. पांडुरंग पाटील बोलताना शिवाजी विद्यापीठामधील हिंदी विभागाच्या विविध कोर्सेस व त्यांचे महत्व समजावून सांगितले. तसेच आधुनिक काळात भाषा प्रौद्योगिकी, अनुवाद, द्विभाषी व विविध पदासाठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थिनींनी भाषेविषयी सजग व अभ्यासू असणे महत्वाचे आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी भाषा कौशल्ये विषयी सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले.
प्रारंभी या कार्यक्रमातील सर्व मान्यवर घटकांचे स्वागत करून प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू हिंदी विभाग प्रमुख डॉ. गजानन चव्हाण यांनी स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. गीता दोडमनी यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. कांती पाटील यांनी मानले. वाड:मय मंडळाचे समन्वयक डॉ. पु. ए. पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांचे सहकार्य लाभले बहुसंख्य विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. अत्यंत सुंदर व नेटके सूत्रसंचालन कु. ऋतुजा जाधव व कु. रूपाली कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाबाबत विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा