Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडून जयसिंगपूर नगरपरिषदचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा गौरव !


माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार 


नेहा जाधव  : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर :  लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली यांनी श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे जयसिंगपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी झेले हायस्कूल ते लिंगायत स्मशानभूमी पर्यंत जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत पेव्हिंग ब्लॉकचा नवा कोरा फूटपाथ बांधण्यात आला तसेच ज्या उघडया नाल्यामुळे जी दुर्गंधी व रोगराई पसरत होती त्याला आळा बसावा म्हणून तो नाला बंदिस्त केला या बद्दल नगराध्यक्षा डॉ. सौ. निता अभिजीत माने,उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी सौ.टीना गवळी, बांधकाम सभापती अनुराधा आडके, नगरसेविका सुलक्षणा रजनीकांत कांबळे, नगरसेवक युनुस डांगे यांनी मोलाचे कामगिरी बजावून झेले हायस्कूल व घोडावत कन्या महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गाची व या परिसरातील नागरिकांची, फूटपाथवरून येणा-या जाणा-यांची सोय केली तसेच दुर्गंधी व रोगराई पासून मुक्तता केली, या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), संस्थेचे चेअरमन मा. श्री. शांतीनाथ कांते व सेक्रेटरी मा. श्री सुहास पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून यथोचित सन्मान करण्यात आला.

     या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. सौ. निता माने यांनी आपल्या संदेशात सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या 'जनसेवा हीच इश्वर सेवा या भावनेने लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे, त्यांनी सत्कार व मान चिन्हाबद्दल संस्थेचे आभार मानले.उपनगराध्यक्ष मा. संजय पाटील यड़ावकर यांनी 'नगरपालिकेच्या माध्यमातून ६०-७० कोटीची चांगली व समाजोपयोगी कामे करता आली. फुटपाथच्या रूंदीकरणामुळे विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करणे सुलभ व सुरक्षित झाले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळे कार्य करण्यास उर्जा व प्रेरणा मिळाली असे उद्गार काढले.

     संस्थचे चेअरमन मा. शांतीनाथ काते यांनी आवाडे दादांचा सत्कार केला तसेच नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ते म्हणाले, आवाडे दादांसारखे लोक प्रतिनिधी म्हणून लोकाची कामे करतात, लोकांच्या सुखदुःखात कुटुंबातील सदस्यासारखे सहभागी होतात म्हणूनच निवडून येतात. आवाडे दादांच्या सारखेच काम जयसिंगपूर नगर परिषदेने केले. शैक्षणिक संकुल हा पूर्णपणे सुरक्षित रहावा तसेच शाळा, महाविद्यालयात प्रत्येक विद्यार्थी सुरक्षितपणे यावा व जावा ही लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची जबाबदारी आहे. या कामी जयसिंगपूर नगरपरिषदेने सहकार्य केले याबद्दल त्यांनी आभार मानले. समाज विकासासाठी संस्था व नगरपालिका मिळून चांगली कामे करूया असे आश्वासन दिले.

     मा. कल्लाप्पा आवाडे दादा यांची वयाची ९३ वर्षे पूर्ण केली असताना माईकसमोर उभे राहून नगरपरिषदेचे आभार मानले व 'गाव सुशोभिकरण योजनेअंतर्गत जो फूटपाथ तयार केला आहे त्यामुळे जयसिंगपूर नगरीच्या सौंदर्यात भरच पडली आहे असे उद्गार काढले. तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून नगराच्या विकसासाठी एकजूटीने काम करू 

       जयसिंगपूर नगरपरिषदेचे कौतुक केले तसेच जयसिंगपूर नगरीमध्ये पूर्वीपासून गाटातटाच्या राजकारणात चांगल्या कामाची स्पर्धा होती व डॉ. जे. जे. मगदूम, डॉ. एस. के. पाटील व या धनपाल झेले यांच्या कामाची आठवण करून दिली तसेच विधायक कामामध्ये राजकारण आणू नका असा लोकप्रितिनिधींना सल्ला दिला. मा. श्री. विनोदभाऊ घोडावत यांनी लड्ढे संस्थेच्या विकासासाठी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी काही इच्छा व्यक्त केल्या.

     कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व परिचय दादा पाटील-चिंचवाडकर यांनी केले. सन्मानपत्र वाचन श्री. व्ही. ई. व्हावळ, उपमुख्याध्यापक, झेले हायस्कूल व आभार मा. श्री. राजेंद्र झेले यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. एस. एस. माणगावे, सौ. व्ही. एस. कामत व सौ. ए. ए. चौगुले यांनी केले. या प्रसंगी जयसिंगपूरचे सन्माननीय नागरीक मा. श्री. संजय पाटील कोथळीकर, मा. श्री. गजकुमार माणगावे, मा. नंदकुमार बलदवा, श्री. राहुल बंडगर, मा. संभाजी मोरे, मा. स्वप्नील पाटील, मा. बी. टी. नाईक, मा. सुनील पाटील, मा. राजेद्र झेले, मा. मुरगुडे आऊ, मा. कुंभोजकर, मा. राजू होसकल्ले, मा. रजनीकांत कांबळे, मा. डी. पी. पाटील, मुख्याध्यापक बळवंतराव झेले हायस्कूल, व घोडावत कन्या महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक व अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनि कॉलेज, श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, श्रीमती विमलमती धनपाल झेले, देवेंद्र दुधराज सावंत प्राथमिक विद्यामंदिर व श्रीमती जयश्री प्रेमचंद घोडावत मुलींचे वसतीगृहाचे चेअरमन, स्कूल कमिटी सदस्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा