Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

*कोल्हापूरच्या भुयेवाडीत बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात उपसरपंचाचा मुलगा ठार ; तीन जण जायबंध*

 

गव्याच्या हल्ल्यात ठार झालेला सौरभ खोत


*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर :  कालपासून सुरू असलेल्या गव्याला हुसकावून लावण्याच्या हुल्लडबाजीत व गव्याने घातलेला धुमाकुळीत बिथरलेल्या गव्याच्या धडकेत एक तरुण ठार व तीन जण जखमी झाले असून ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री भुयेवाडी ता करवीर येथे ही घटना घडली आहे. सौरभ संभाजी खोत (वय 22, रा. भुयेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने शिये, भुये व भुयेवाडी परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

      मुळात गवा हा अत्यंत शांत प्राणी असून तो त्याच्या नैसर्गिक अधिवासा पासून अन्नाच्या शोधात भटकत असतो. परंतु गेल्या दोन दिवसापासून संबंधित गावातील नागरिकांकडून गव्याला हुसकावून लावण्यासाठी गाव पातळीवरून प्रयत्न केले जात होते. परंतु बिथरलेल्या गव्याने गावकऱ्यांच्या वरच हल्ला चढविला. त्यामुळे मयत तरुणाच्या डाव्या बरकडीजवळ गव्याचे शिंग घुसल्याने व त्यास उचलून आपटल्यामुळे हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर आणखी तिघांच्यावर हल्ला चढविल्यामुळे दोघेजण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.

      या घटनेने पुन्हा एकदा गवा व मनुष्यप्राणी यांच्यामधील संघर्ष दिसून आला. ही घटना अत्यंत गंभीर असून संबंधित विभागाने गावकर्यांना व गव्याना सुरक्षित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांच्याकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा