Breaking

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

*संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

 

न्यू इंग्लिश स्कूल आगर येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा


ओंकार पाटील :  शिरोळ प्रतिनिधी


  शिरोळ :  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ (आगरभाग ) शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर या विद्यालयात "संत ज्ञानेश्वर माऊली संजिवन समाधी सोहळा ७२५ पूर्ण झाली  याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यास क्रमाबरोबरच अध्यात्मिक संस्काराची ओळख व्हावी या उद्देशाने विद्यालयात " संत ज्ञानेश्वर माऊली संजिवन समाधी सोहळा " मोठ्या उत्सहात संपन्न झाला. 


     आगरभाग पंचक्रोशीतील व शिरोळ भागातील वारकरी भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शहाजीराव दाभाडे , सचिव मा. मेजर श्री. के. एम् भोसले सर खजिनदार मा. श्री . कृष्णात पाटील , संचालक व रेल्वे पोलिस मा.श्री. विलासराव पाटील , संचालक व तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचात मौजे आगर मा.श्री. सुरेश राव पाटील , संचालक व सरपंच मौजे आगर मा.श्री. अमोल चव्हाण सो संचालक व एल .आय सी. अधिकारी मा.श्री. अमित जाधव संचालक मा.श्री. मांजरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. खंडेराव जगदाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. मेजर के. एम् भोसले सरांनी आपल्या स्वागतामधून संत ज्ञानेश्वर महिमा ,संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजिवन समाधी कशा पद्धतीने घेतली.या विषयी सविस्तर माहिती  विद्यार्थ्यांना व तमाम वारकरी भक्तजनांना देण्यात आली. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. खंडेराव जगदाळे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची गोडी कशी निर्माण होईल या विषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने या वेळी वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह .भ . प पिलासाहेब सिताराम देशमूख , ह . भ. प महेश दत्त कळेकर , ह .भ. प एकनाथ हरी पाटील , ह. भ. प रंगराव हरी काळे ह.भ.प आप्पासो महादेव आडके इत्यादी माऊलींना सन्मानित करण्यात आले . त्याचबरोबर या सोहळ्यास इतर वारकरी भक्ताचाही संस्थेच्या वतीने सन्मानपत्र उपरणे , टोपी , श्रीफळ ,पान ,सुपारी देऊन गौरविण्यात आले . त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही सत्कार संस्थेचे सचिव मा.श्री. के. एम् भोसले सर यांच्या शुभहस्ते ज्ञानदीप पुरस्कार देऊन सर्व करण्यात आला. कु. वैष्णवी हजाम या विद्यार्थिनी ने पसायदान गाऊन सर्व वारकरी भक्तांना मंत्रमुग्ध केले.

       शेवटी आभार प्रदर्शन विद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक सौ. सुप्रिया दाभाडे मॅडम यांनी व्यक्त केले . सुत्रसंचालन मा. श्री. प्रमोद पाटील व नितिन बागुल सरांनी केले.

     या सोहळ्याच्या निमित्ताने पालक वर्गाकडून समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा