संग्रहित छायाचित्र |
गुगल सर्च इंजिन हे असे माध्यम आहे जिथे एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती आपण मिळवू शकतो.परंतु गुगलवर काहीही सर्च करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. जर तुम्ही गुगलवर या ६ गोष्टी चुकूनही सर्च केल्या तर तुम्हाला भारी पडू शकतात. जाणून घ्या या सहा गोष्टी.
1.चाइल्ड पॉर्न
तुम्ही गुगलवर चाईल्ड पोर्न संबंधी सर्च केले तर तुम्हाला पास्को अॅक्ट २०१२ नुसार सेक्शन १४ अंतर्गत ५ वर्ष ते ७ वर्षांपर्यंत जेलची शिक्षा होऊ शकते.
2.कोणत्याही पीडितेचे नाव आणि फोटो शेअर करणे
कोणत्याही पीडित व्यक्तीचा फोटो किंवा नाव शेअर करणे किंवा छेडछाड वा दुर्व्यवहार झाला असेल, तर त्याला शेअर करणे बेकायदेशीर आहे.
3.फिल्म पायरेसी
जर तुम्ही फिल्म पायरेसी करीत असाल तर हे सिनेमाटोग्राफी अॅक्ट १९५२ च्या अंतर्गत गुन्हा असून यासाठी कमीत कमी ३ वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
4.गर्भपात संबंधी माहिती
जर तुम्ही गुगलवर गर्भपात संबंधी माहिती शोधत असाल तर हे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.
5.खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे
फक्त गुगलवर नव्हे तर कोणाच्याही परवानगीशिवाय, फोटो किंवा व्हिडिओ बनवल्यास तसेच ते शेअर केल्यास गुन्हा आहे. तुम्हाला यासाठी जेलची हवा खावी लागू शकते.
6.बॉम्बची प्रोसेस
जर तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा तयार करणे हे सर्च केल्यास तुमची जेलची हवा पक्की ठरू शकते. त्यामुळे चुकूनही असे काही करू नका ज्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा