Breaking

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेरणादायी कार्य ; नांदणीच्या श्रावण बाळ विकलांग संस्थेस केली मदत*

 

राष्ट्रीय सेवा योजनेने विकलांग संस्थेस केली मदत

जीवन आवळे  : विशेष प्रतिनिधी


   जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने  जागतिक विकलांग दिनानिमित्त राष्ट्रसेवेच्या भावनेने नांदणीच्या 'श्रावणबाळ विकलांग संस्थेस अन्नधान्याची मदत केली. यावेळी जयसिंगपूर कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे उपस्थित होत्या.

    सदर मदत स्वीकारताना विकलांग मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद व मनामध्ये समाधान व मुखामध्ये आभाराचे भावना विकलांग मुलांच्या मधे होती. यावेळी विकलांग मुलांनी आपल्या कलागुणांचे कौशल्य दाखवत सर्वांना अचंबित केले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विकलांग मुलांच्या सोबत गाण्यांचे सूर ओढत विकलांग मुलांचे मनोरंजन केले. 

     यावेळी जयसिंगपूर कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे यांनी विकलांग मुलांच्या मध्ये असणारे कौशल्य पाहून त्यांना पाठीवरती शाब्बासकीची थाप देत उच्च प्रगतीच्या शिखरावर पर्यंत पोहचावे असा आशीर्वाद दिला.

    यावेळी श्रावणबाळ विकलांग संस्थेचे संचालक मा.जंगटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे आभार मानले.

          सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ.खळदकर, सामाजिक कार्यकर्ते बाहुबली भनाजे, जीवन आवळे यांचासह गणेश कुरले,विक्रांत माळी, गौरव पाटील ,नेहा राठोड, दिव्या रासुरे, सातपुते,प्रदून्न कांबळे, तेजस राठोड, ओंकार पाटील,सत्यजित माने, विवेक कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा