Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपुरात एड्स जनजागृती रॅली ; जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जपली प्रबोधनाची राष्ट्रीय बांधिलकी*


जागतिक एड्स दिनानिमित्त एनएसएस तर्फे प्रबोधन रॅलीचे आयोजन


*मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक*


जयसिंगपूर  : १ डिसेंबर जागतिक एड्स दिन व एड्स पंधरवडा निमित्त जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होते. या रॅलीस प्र-प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रेरित करीत  रॅलीला सुरुवात झाली.

      प्र-प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व प्रा.डॉ.के.डी. खळदकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीस  कॉलेज कॅम्पस मध्ये एड्स जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कॉलेज कॅम्पस मधून रॅलीला सुरुवात झाली ही रॅली शिरोळ-वाडी रोड या मार्गाद्वारे मार्गस्थ होत असताना जनजागृतीपर घोषणा देत पुढे जात होती. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनी स्वयमसेवकांची संख्या लक्षणीय होती. एड्स या महा आजाराबाबत जनजागृती करणारे बोर्ड विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते. ही रॅली मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गांधी चौकात आली. त्यानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयासमोरून मार्गस्थ होत  झाशी चौकातून पुढे जयसिंगपूर पोलीस ठाण्यात समोरून जात ती  सांगली-कोल्हापूर रोड वरील ऐतिहासिक क्रांती चौकात आली.

रॅली मधील काही क्षणचित्रे/ छायाचित्रे

       क्रांती चौकात आल्यानंतर छत्रपती शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याच ठिकाणी थांबली. गावातील प्रतिष्ठित व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन या रॅलीला पाठिंबा देत या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर कॉलेजच्या प्र-प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी  'संयम पाळा - एड्स टाळा', 'अभी नही तो कभी नही' व

अन्य एड्स जन जागृती विषयक घोषणांनी क्रांतीचौक दणाणून सोडला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हातातील प्रबोधनात्मक फलक व पोट तिडकीने दिल्या जाणाऱ्या घोषणा ऐकून संवेदनशील मात्र एक अशिक्षित सीनियर रिक्षाचालक मा.काझी यांनी या रॅलीला भेट देत NSS चे कौतुक करून संपूर्ण देश एड्स मुक्त झाला पाहिजे अशा प्रकारच्या उदात्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.

         यानंतर प्र-प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांनी एड्स जन जागृती संदर्भात उत्तम मार्गदर्शन करीत सर्वांनी संयम पाळून सुरक्षित राहण्याचे आवाहन यानिमित्ताने केले. याप्रसंगी कॉलेजचे प्रा.डॉ.कु.वंदना देवकर, प्रा.एस.व्ही. चौगुले,माजी एनएसएस ॲम्बेसिडर जीवन आवळे, गणेश कुरले, गुलाबराव माळी, सीनियर विक्रांत माळी, नेहा राठोड, गौरव पाटील, यांच्या उत्तम नियोजनानुसार तसेच प्रद्युन कांबळे, विवेक कांबळे,दिव्या रासुरे, निकिता सातपुते, ओंकार पाटील, राठोड, सत्यजित माने, नेहा जाधव,तेजल भोसले,श्रुती चव्हाण यांच्या सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे संपन्न झाली. या रॅलीमध्ये ६० स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते.

        जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाने काढलेल्या एड्स जनजागृती रॅलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 टिप्पणी: