Breaking

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

प्रा.प्रकाश कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाची इंग्लिश विषयातील पीएच.डी पदवी प्रदान ; मार्गदर्शक म्हणून डॉ. पी. बी.पाटील


व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. प्रकाश कुंभार यांची इंग्रजी विषयात पीएच.डी.

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


    कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या संलग्नित महाविद्यालयापैकी म.ह.शिंदे हे महाविद्यालय आहे.प्रा.प्रकाश कुंभार हे महाविद्यालय व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील परिपूर्ण व  सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व होय.प्रा.कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठास डॉ.पी.बी.पाटील यांच्या सक्षम व उत्तम मार्गदर्शनाखाली "द सिलेक्टड नोवेल्स ऑफ थीया अस्तले: अ स्टडी इन पोस्ट कोलोनिअल कॉन्स्कीअसनेस' या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना याकामी शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.

सामाजिक संवेदनशीलता दाखवीत विविध उपक्रमात सहभाग

                  प्रा. प्रकाश कुंभार यांच्या अध्यापन कार्याची सुरुवात इचलकरंजी व कोल्हापूर येथील अनुक्रमे वेंकटेश महाविद्यालय आणि महावीर महाविद्यालय या नामांकित महाविद्यालयात झाली. त्यानंतर प्रा.प्रकाश कुंभार हे म.ह.शिंदे याच महाविद्यालयात गेली २५ वर्षे प्रामाणिक व अविरतपणे अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाची उंची पाहता त्यांनी महाराष्ट्र विद्यापीठे कायदा 2016, प्राध्यापक पदोन्नती, सेवाशर्ती, नॅक  मुल्यांकन अशा असंख्य विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे. विद्यापीठाच्या प्रसिद्ध अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. 

विविध कार्यशाळेत प्राध्यापक व विद्यार्थ्यांना संबोधताना

     शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या अर्थात सुटाच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या ५,६ व ७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. या आंदोलना दरम्यान प्राध्यापक संघटनेची कार्यवाह व कार्यालयीन कार्यवाह म्हणून समर्थपणे धुरा सांभाळली. तसेच ते प्राध्यापकांची पतसंस्थेचे संचालक म्हणून काम करतांना संस्थेच्या विस्तारीकरण करण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवाजी विद्यापीठाच्या अत्यंत महत्वाच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सिनेट या वरिष्ठ सभागृहावर  तसेच व्यवस्थापन परिषदेवर ते बिनविरोध म्हणून निवडून गेलेले एकमेव सदस्य आहेत. विद्यार्थी, शिक्षक, संस्था, विद्यापीठ केंद्रस्थानी ठेवून प्राध्यापक संघटनेची भूमिका अतिशय समर्थपणे सभागृहात मांडतात. त्यामुळेच त्यांना विद्यापीठाच्या 'प्राध्यापकांचे परिनियम', अग्रणी महावीद्यालय योजना, चेंजस इन स्टाफ, कमकुवत महाविद्यालय अर्थसहाय्य योजना, स्थानिक चौकशी समिती, ब्रहत आराखडा, दर्जा हमी अश्या अनेक समित्यांवर संधी त्यांना मिळाली. तसेच ते 'प्राध्यापक विश्व'  या मासिकच्या संपादक मंडळावर कार्यरत आहेत. या पूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठ बी.कॉम.साठी असणाऱ्या इंग्रजी विषयाच्या क्रमिक पुस्तक व दूरशिक्षण साठी लिखाण केले आहे.

माजी कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे समवेत

          एक  सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्त्व व प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी झटणारे हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने विद्यार्थी हितार्थ कार्य करत असताना महापूर काळात शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालेल्या महाविद्यालयाना भेटी देऊन शिवाजी विद्यापीठाचे आर्थिक सहाय्य मिळवून दिले, तसेच महापूर काळात नुकसान झालेल्या  कुटुंबांना वस्तू व रोख रक्कम स्वरूपात मदत केली आहे. गणेशोत्सव काळात महाप्रसाद वाटप केले आहेत.

      महाविद्यालयाच्या 'अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे' समन्वयक म्हणून गेली १७ वर्षे काम पाहिले आहे. त्याचा परिपाक म्हणून  ग्रामीण भागातील महाविद्यालयाला ब++(2.87 )  हे मानांकन मिळाले.त्यांनी राष्ट्रीय सेमिनार मध्ये संशोधन लेखाचे वाचन केले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो कार्यशाळा आणि सेमिनार मध्ये साधन व्यक्ती म्हणून सुद्धा काम केले आहे.

उच्चपदस्थ घटकांच्या बरोबर विविध कार्यक्रमात 


        मुळात सामाजिक भान असल्याने प्राध्यापक घटकांच्या असलेले शैक्षणिक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यांचा एकूण शैक्षणिक चळवळीचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय राहिलेला असून ते सातत्याने आक्रमकपणे प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत असतात. यासाठी त्यांचे सहकारी मित्र प्रा.डॉ. आर.जी.कोरबू यांच्या साथीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्राध्यापक घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुटाच्या माध्यमातून केला आहे. सुटाच्या वरच्या फळीतील शिलेदार प्रा.कुंभार व डॉ. कोरबू ही जोडगोळीने अनेक शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. सुटा संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या न्याय- हक्कासाठी सातत्याने धडपडत राहणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे.प्रा कुंभार हे मान-अपमानापेक्षा तसेच विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असतानाही पदाचा गर्व न बाळगता व गवगवा न करता सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे त्याचे राहणीमान असते.मात्र कामाला प्राधान्य देणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. खरं म्हणजे प्रचंड अभ्यासांती त्यांच्याकडे असलेलं शैक्षणिक कायद्याच्या माहिती व  ज्ञानाच्या आधारावर कधी कधी विद्यापीठातील घटकांनाही ते मार्गदर्शन करीत असतात. इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व,अत्यंत प्रामाणिक, अभ्यासू, चळवळीशी एकनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ,आक्रमक व न्याय मिळवून देणे ही त्यांची महत्वाची स्वभाव वैशिष्ट्ये दिसून येतात.

      सदर संशोधनामध्ये डॉ. सरवदे सर, डॉ.करिकट्टी मॅडम, डॉ. बार्वेकर मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मा. पी जी शिंदे , मा स्वप्नील शिंदे, प्रा.डॉ.शिंदे, डॉ.डी.आर.मोरे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहन व सहकार्य मिळाले. तसेच सुटाचे मार्गदर्शक प्रा. एस.जी.पाटील(बाबा),सुटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर, सांगली जिल्हा समन्वयक प्रा.टी.व्ही.स्वामी यांचे विशेष सहकार्य लाभले.

      प्रा.प्रकाश कुंभार यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याने शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील समस्त प्राध्यापक घटकांना तसेच शैक्षणिक चळवळीतील सर्व शिलेदाराना आनंद झाला असून विशेष करून सुटामध्ये मात्र आनंदोत्सव साजरा झाला.

      सरतेशेवटी एवढच की, शैक्षणिक चळवळीच्या या प्रवासामध्ये स्वतःच्या लाभाकडे दुर्लक्ष करून प्राध्यापक हितार्थ निस्सीम सेवा केल्याने पीएच.डी. संशोधन कार्याला प्राधान्य देऊ शकले नाही मात्र शैक्षणिक आंदोलन, सुटाची चळवळ व पीएच.डी. संशोधन या तिन्ही गोष्टी- करताना तारेवरची कसरत करावी लागली मात्र हाडाचा कार्यकर्ता व सामाजिक बांधिलकी जपणारा प्राध्यापक ही भूमिका पार पाडली. निस्वार्थी भावनेने शैक्षणिक प्रवाहात काम करताना प्रा. कुंभार यांनी  पीएच.डी. ही पदवी संपादन केली आणि खऱ्या अर्थाने समस्त शैक्षणिक प्रवाहातील सर्व घटकांचा ज्ञानरूपी विजय झाला.

       प्रा.प्रकाश कुंभार यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

1 टिप्पणी: