Breaking

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

मणेराजुरीच्या डोंगराजवळ तीन मृतदेह सापडले : परिसरात एकच खळबळ


 मणेराजुरीच्या डोंगरावर तीन मृतदेह सापडले


प्रविणकुमार माने : उपसंपादक


सांगली : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या गावातील डोंगराजवळ १ युवक व २ युवतींचे मृतदेह व त्यांच्याजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत.

       प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मणेराजुरीच्या शेख फरदीन बाबा डोंगरावर तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे यामध्ये १ युवक व २ युवतींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत.आत्महत्या केलेला मध्ये मयत युवक हरिश हनुमंत जमदाडे वय वर्ष २१ रा.मणेराजुरी,मयत युवती मुळगाव जयगवाण ता. कवठेमहांकाळ सध्या राहणार मणेराजुरी आहे. तर दुसऱ्या मयत युतीची ओळख अद्याप पटलेली नाही.

      ही घटना आज सकाळी उघडकीस आली बुधवारी रात्री या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे घटनास्थळी द्राक्ष  बागायतीसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत एका युवतीशी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन सतर्क असून काम युद्धपातळीवर सुरू आहे.या तिघांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

    या घटनेने मणेराजुरी व आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा