रक्तदान करताना एनसीसी कॅडेट व कॅप्टन डॉ.संतोष जेठीथोर |
हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
कागल : २३ डिसेंबर रोजी डी.आर. माने महाविद्यालयाचे संस्थापक सचिव, शिक्षणप्रेमी कै. वाय. डी. माने (आण्णा) यांची जयंती रक्तदान दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरी करण्यात येत असून या ही वर्षी अतिशय उत्साहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष, मा. श्री. सुनील माने यांनी केले.
एन सी सी कॅडेट्स व एन एस एसचे स्वयम् सेवक विद्यार्थी |
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे संचालक, मा.बिपिन माने यांनी रक्तदात्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आज आण्णांची ९१ वी जयंती आपल्या संस्थेत सर्वत्र साजरी होत आहे. तर आपल्या महाविद्यालयात अण्णांच्या जयंती निमित्त रक्तदान दिन साजरा केला जातो आहे. हा रक्तदान दिन २१ वर्ष अखंडपणे चालू आहे आणि पुढेही चालू राहील. या माध्यमातून अण्णांचे समाजाभिमुख कार्य आपण पुढे नेतो आहोत. या रक्तदान शिबिराच्य माध्यमातून या कागल तालुक्यातील गरजूंना मदत होते. त्यामुळे हे कार्य समाजासमोर आदर्शवत आहे असे ते म्हणाले.
मार्गदर्शन करताना मा.बिपिन माने |
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण चौगले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कॅप्टन संतोष जेठिथोर यांनी केले. तर आभार एन. एस. एस. प्रमुख, डॉ. धनाजी पाटील यांनी मानले. यावेळी उपस्थित ज्युनिअर विभागाचे NSS प्रमुख, प्रा. जी.एन. भोसले, प्रा. सोमनाथ तेली व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यी राजर्षी शाहू ब्लड बँक सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील एन. सी. सी. व एन. एस. एस. चे स्वयंसेवकांनी व प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. जवळ जवळ ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कागलच्या डी.आर.माने कॉलेजने सलग २१ वर्ष रक्तदानाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या रचनात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हा उपक्रम प्रत्येक सामाजिक संस्थेला प्रेरणादायी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा