Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

*रूकडीच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न*



💥 * गणेश कुरले   :  विशेष प्रतिनिधी


रुकडी :  येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. गिरीश मोरे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे होते.

        या कार्यक्रमात प्रमुख वक्ते व कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ.गिरीश मोरे  ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन करताना  म्हणाले डाॕ. बाबासाहेब आंबडेकर यांनी केवळ दलितांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि अस्पृश्यता नाहीसी करण्यासाठी कार्य केले नसून संपूर्ण भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. देशातील कामगार, मजूर, शेतकरी यांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे, याशिवाय पाणी नियोजन, बंधारे कसे बांधावेत, शेतीचे राष्ट्रीयीकरण, मजुरांना हक्क आणि कामाचे किती तास असावेत, योग्य वेतन मिळाले पाहिजे यासाठी आवश्यक ते कायदे केले, रिझर्व्ह बँकेची निर्मिती कशी करावी अशा विविध  विषयावर  योग्य असे मार्गदर्शन केले आहे. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीय नागरिकांना वेगवेगळ्या समस्यातून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.   

    डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.प्रशांत कांबळे होते. 

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक  श्री. भाऊसाहेब वडार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे म्हणाले, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः साठी किंवा स्वतःच्या जातीसाठी जगले नाहीत तर संपूर्ण भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले, संपूर्ण जगामध्ये आदर्श ठरणारी राज्यघटना डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे.आभार डाॕ.शंकर दळवी यांनी मानले तर सूत्रसंचालन बी.ए. भाग दोन मधील कु. ऋतुजा जाधव हीने मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा