Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

*विद्यापीठाच्या दूरशिक्षणासाठी प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही: कुलगुरू मा.डॉ.डी.टी.शिर्के*

 

मा. कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठ कोल्हापू


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता विद्यापीठ प्रशासन निश्चितपणाने घेईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली आहे.

      कुलगुरु मा.डॉ.डी.टी.शिर्के संदर्भ घेऊन म्हणाले की, पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती नसल्याचे कारण दाखवित विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रास प्रथम वर्षाचे प्रवेश देण्यास स्थगिती दिली आहे. तथापि, आयोगाने दूरशिक्षणाच्या संदर्भात जितक्या त्रुटींचा निर्देश केला होता, त्या सर्व त्रुटींची पूर्तता विद्यापीठ प्रशासनाने केलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्रात पूर्ण वेळ संचालकांची नियुक्ती या पूर्वीच करण्यात आलेली आहे. दूरशिक्षण केंद्राच्या स्थापनेपासून विद्यापीठ जी पद्धत अवलंबत संचालकांची नियुक्ती करत आले आहे. त्याच पद्धतीने सदर संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शनानुसार यंदा दूरशिक्षण केंद्राकडे भरती करण्यात आलेल्या शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी असून त्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाही वेळेत पार पडली असल्याचे ते म्हणाले. तसेच, दूरशिक्षण पद्धतीत प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत नुकसान होऊ देणार नाही. यासाठी आयोगाकडे विद्यापीठाकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी अधिकार मंडळांच्या मान्यतेने पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया प्राधान्याने व शीघ्रगतीने पूर्ण करण्यात येईल, तसेच पुढील वर्षी सदर विद्यार्थ्याना दूरशिक्षण पद्धतीमध्ये सामावून घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे श्रम, वेळ आणि पैसा वाया जाणार नाही, याची दक्षता विद्यापीठ प्रशासन निश्चितपणे घेत आहे, असेही अशा प्रकारचे जबाबदारीपूर्ण व आश्वासित विधान कुलगुरूंनी केले आहे.

            तरी संबंधित विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठ प्रशासन व मान्य कुलगुरूंनी दिलेल्या ग्वाहीनुसार स्थिर राहावे.

1 टिप्पणी:

  1. अभिनंदन सर, दूरशिक्षण केंद्रात प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे.

    उत्तर द्याहटवा