विक्रांत माळी यांनी इंडियन आयडॉल मध्ये प्रथम क्रमांक मिळविला |
पुरस्कार विजेता विक्रांत माळी |
*ओंकार पाटील : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : उदगाव ता.शिरोळ येथे आयोजित सोनी मराठी चॅनेल प्रायोजित अभिमान देशाचा,आवाज महाराष्ट्राचा! 'इंडियन आयडल मराठी' स्वररथ या कार्यक्रमामध्ये जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी विक्रांत गुरुदेव माळी याने प्रथम स्थान मिळवून ही स्पर्धा जिंकत रसिक प्रेक्षकांची मने ही जिंकली.
जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे बी.ए. भाग.३ मराठी विभागात शिकत असलेला विक्रांत गुरुदेव माळी हा विद्यार्थी सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सातत्याने सांस्कृतिक कलाविष्कार करीत असतो. शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवांमध्ये तो सक्रियपणे सहभागी होत असतो. तसेच बाहेर होणाऱ्या विविध व्यावसायिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत .सदरच्या कार्यक्रमामध्ये 'हृदयी वसंत फुलताना' आणि 'गणपतीची आरती duet आवाजात' सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तसेच इंडियन आयडल मराठी' स्वररथ या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या फेरीसाठी त्याची निवड झाली आहे.
मुळात त्याचे वडील गुरुदेव बाबुराव माळी हे स्वतः उत्तम गायक असून त्यांनी दिलेल्या गायन संस्काराने तोही उत्तम पट्टीचा गायक बनला आहे. 'कराओके' या कार्यक्रमांतर्गत तो सातत्याने आपल्या मधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकत असतो अर्थात त्याच्या वडिलांची उत्तम साथ असते. २०२० मध्ये राजस्थान येथे झालेल्या गायन स्पर्धेत त्याचा द्वितीय क्रमांक मिळविला होता.
सदरची स्पर्धा जिंकून मिळवलेल्या सुयशात कॉलेजच्या प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सौ.मनीषा काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने व वडील श्री.गुरुदेव माळी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सौ.मनीषा काळे यांनी त्याचा यथोचित सत्कार करून त्याच्या पुढील वाटचालीस मनोभावे शुभेच्छा दिल्या.
त्याने मिळवलेल्या या पुरस्कारामुळे श्री.विक्रांत माळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या तो राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या सुरेल आवाजाच्या साह्याने सेवाभावी वृत्तीने प्रबोधनात्मक गाणी गात असतो.
हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवाविक्रांत हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवाCongratulations
उत्तर द्याहटवा