शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

*महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे नेट / सेट मुक्त प्राध्यापकांचा 'सुटा' तर्फे मेळाव्याचे आयोजन*

 

सेट-नेट मुक्त प्राध्यापकांसाठी मेळावा


प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


         कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) तर्फे नेट / सेट मुक्त प्राध्यापकांना पेन्शन योजना लागू करणारा शासन निर्णय झाल्याप्रकरणी संबंधीत प्राध्यापकांचा मेळावा रविवार दि.५ डिसेंबर २०२१ रोजी दु.२.०० वाजता 'महावीर महाविद्यालय, कोल्हापूर'  येथे आयोजित केला आहे. त्या मेळाव्यामध्ये पेन्शनच्या शासन निर्णयाबाबत अधिक सविस्तर माहिती देण्यात येईल. याशिवाय डी. सी. पी. एस.,एम.फील. / पीएच.डी. याचिका, नेट/सेट याचिका, अतिरिक्त शिक्षकांच्या बाबत माहिती इ. बाबत माहिती देण्यात येईल. तसेच प्राध्यापकांच्या इतर प्रश्नांबाबतही मा. सुधाकर मानकर व मा. प्रा. टी. व्ही. स्वामी हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर. के. चव्हाण आहेत तर विशेष उपस्थिती म्हणून 'सुटा' चे मुख्य समन्वयक मा. प्रा. एस. जी. पाटील हे राहणार आहेत.

        तरी संबंधीत मेळाव्याला प्राध्यापकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करणारे पत्रक 'सुटा' कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरूण पाटील यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा