Breaking

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

आता मुलींच्या लग्नाचे वय होणार १८ वर्षावरून २१ वर्षे ? प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

संग्रहित छायाचित्र


 

नवी दिल्ली : देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेत मांडण्यासाठी मंजुरी दिली होती. आणि त्या प्रस्तावाला संसदेने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे.

(marriage age of women from 18 to 21 years cabinet clears proposal says sources)


     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच याचा उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय २१ आणि महिलांचे १८ वर्षे आहे. 

      गेल्या वर्षी जूनमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याचा अहवाल दिला होता. पहिल्या मुलाला जन्म देतेवेळी महिलेचे वय हे २१ वर्षे असावे. लग्नाला उशीर झाल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे टास्क फोर्सने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा