Breaking

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली. मात्र घातल्या या अटी.

संग्रहित छायाचित्र



      आज सुप्रीम कोर्टाने बहुप्रतिक्षित अशा बैलगाडी शर्यत चालू करण्यास परवानगी दिल्याने सध्या महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. मात्र न्यायालयाने ह्या शर्यतीमध्ये काही नियमावली घालून दिली आहे. जर या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा बैलगाडी शर्यतींवर बंदी येवू शकते. 

     ज्या सामाजिक संस्थेच्या तक्रारीमुळे या बैलगाडा शर्यती बंद झाल्या होत्या त्या पेटा (PETA) संस्थेने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता घटनापीठाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिथे जर निर्णय फिरला तर पुन्हा बैलगाडी शर्यतीवर बंदी येऊ शकते. 


या असतील शर्यती साठी अटी -


  • बैलगाडी शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी शर्यत केल्यास गुन्हा दाखल होणार.
  • शर्यतीदरम्यान बैलांना क्रूर वागणूक देता येणार नाही
  • बैलगाडी शर्यतींचे चित्रीकरण होईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याची शक्यता
  • राज्य सरकारने तयार केलेली नियमावली गाडीमालकांना पाळावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा