Breaking

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

'स्त्रीची होणारी तारेवरची कसरत आणि स्त्री वरील अन्याय' यावर महिला महाविद्यालय कसबा बीड येथे कार्यशाळा संपन्न!



 महिला महाविद्यालय कसबा बीड येथे अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत स्त्रीची होणारी तारेवरची कसरत आणि स्त्री वरील अन्याय!या विषयावरील दोन सत्रातील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

      सदर कार्यशाळा प्रथम सत्रास गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर येथील रसायन शास्त्र शाखा, सहाय्यक प्राध्यपक डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी आणि भूगर्भ शास्त्र शाखा, सहायक प्राध्यापक डॉ. योगिता अभिजित पाटील यांनी स्त्रियांवर होणारे दैनंदिन जीवनात होणारे अत्याचार ,अन्याय याचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष होणारे परिणाम आणि आजच्या तरुण तरुणींनी यावर जरूर विचार करून सदुढ समाजाची गरज संपन्न कुटुंब ही असावी असे प्रखरपणे सांगितले.




     स्त्रीला आपल्या गरजेनुसार घरामध्ये,  समाजामध्ये, कुटुंबामध्ये गृहीत धरले जाते आणि अन्याय अत्याचार याला स्त्री ला कायमच जबाबदार धरले जाते, कधी नात्यातून, कधी रीतीतून, कधी कायद्याने तर कधी जबरदस्ती करून. यासाठी सर्वांनीच आत्मपरीक्षण करावे आणि जबाबदारीचे भान राखून सर्वांना योग्य न्याय द्यावा.मुलींनीही आपल्या मुलगी, स्त्री होण्याचा आदर ठेऊन स्वतः प्रती प्रगती एक मनुष्य म्हणून साधावी.असे प्रतिपादन डॉ. स्मिता गिरी यांनी करतानाच मुलांचा, पुरुषांशी गैरव्यवहार करू नये असे सांगीतले आणि मुलांनाही  एक जबाबदार नागरिक होऊ द्यावे.

      डॉ योगिता पाटील मॅडम यांनी प्राचीन, अर्वाचीन काळापासून होणारी स्त्रीच्या स्त्रितत्वाची चालवलेली विटंबना ही आजच्या मॉडर्न युगातही जाहिरातींमधून , कामाच्या ठिकाणी केलेल्या वर्तनातून कशी करत आहे हे उदाहरणातून स्पष्ट केले.



फक्त ५०टक्के आरक्षण एवढाच हा विषय नसून भविष्यात निर्माण होणारी पिढीवर होणारे संस्कारही सदृढ मनुष्य साठी आवश्यक आहेत, यासाठी डॉ स्मिता गिरी यांनी पुरुष आणि स्त्री हा लिंगभेद लक्षात घेऊन केवळ मनुष्य धर्माचे पालन एकमेकांचा आदर करत करावे असे सुचवले.

      डॉ योगिता पाटील यांनी स्त्रिवरील अन्याय थांबवायचा असेल तर शिक्षण आणि कायद्याची योग्य वेळी अमलबजावणी व्हावी असे सुचवले.

      स्त्रीची होणारी घालमेल आणि तिच्याकडून रूढी, परंपरा आणि आधुनिकता यांचा वाढता बोजा कमी होण्यासाठी सर्वांनी जबाबदारी वाटून घेतली तर तिची तारेवरची कसरत कमी होईल असे करण्यासाठी विचारांची दिशा योग्य असावी असे स्पष्ट केले.



     या कार्यशाळेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. सौ. सुचेता भोसले यांनी त्यांच्या अध्यक्षीय मार्ग दर्शन मधे पुढच्या पिढीने , तरुणांनी पुढारलेला भारत बनवताना स्त्री पुरुष यांच्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक आणि गुणात्मक शक्तींचा अभ्यास करावा आणि सदृढ भारताची सदृढ समाज उभारण्यास सहाय्य करावे असे सांगितले.

      अग्रणी कार्यशाळा समन्वयक प्रा. स्नेहल पाटील यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. रोहिणी बंडागले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अभया किल्लेदार आणि प्रा. स्नेहल पाटील यांनी अत्यंत सुसुत्रपने केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा