Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रायगडास भेट ; तब्बल ३५ वर्षानंतर राष्ट्रपतींची रायगडास भेट. याआधी जेव्हा राष्ट्रपती रायगडावर आले होते तेव्हा केले होते हे महत्वपूर्ण काम




     राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांनी आज रायगडावर पोहचून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं आहे. तब्बल ३५ वर्षानंतर राष्ट्रपतींचे यांचे किल्ले रायगड येथे आगमन झाले आहे.  किल्ले रायडावर त्यांच्या स्वागतासाठी (raigad) खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समवेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही आहेत. (president ramnath kovind visited raigad fort)


  शिवप्रेमींनी गडावर हेलिकॉप्टर उतरवण्याला विरोध केल्यामुळे ते हेलिकॉप्टरने पाचाड येथे उतरले होते, त्यानंतर आज दुपारी ते किल्ले रायगडवर रोपवेने  पोहचले. रायगड जिल्ह्यात कडक सुरक्षा यंत्रणा ठेवली गेली होती.


     

 

    १९८५ ला राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर आले होते. त्यानंतर ३५ वर्षांनंतर राष्ट्रपतींनी रायगडाला भेट दिली आहे. यामुळे शिवप्रेमींच्यामध्ये मोठा उत्साह होता. सन १९८० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले होते. या घटनेला पस्तीस वर्षे झाली आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा