बस्तवाड येथे मान्यवरांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन |
प्रा. चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी
बस्तवाड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शाखा बस्तवाड 'नामफलक' उद्घाटन सोहळा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.गजानन (आण्णा) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनवासे कोल्हापूर जिल्हा संघटक संजय (आबा) भंडारे यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.भगवंत (दादा) जांभळे तसेच शिरोळ तालुकाध्यक्ष मा.कुमार पुदाले यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जांभळे बोलताना म्हणाले की,तालुक्यात 'गाव तिथे शाखा....घर तिथे महाराष्ट्र सैनिक' हि मोहीम सुरू असून येत्या दिवसात पूर्ण तालुका 'मनसेमय' होणार आहे. बस्तवाड गावात लवकरच प्रवाशी नागरिकांसाठी पक्षाच्या वतीने उभे करण्यात येणाऱ्या 'निवारा शेड' साठी पुरेपूर लागेल ती मदत करू असे आश्वासन देऊन शाखेच्या वतीने लोकाभिमुख जनसेवा व सामाजिक उपक्रम राबवावेत असे सांगितले.
याप्रसंगी बस्तवाड शाखाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक,उपाध्यक्षपदी प्रदीप जंगम, सचिव पदी अमोल जंगम यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते 'निवड पत्र' देण्यात आले.
यावेळी शिरोळ तालुका उपाध्यक्ष अभिनंदन पाटील,संतोष केटकाळे,जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे,उपाध्यक्ष अमित पाटील,कामगार सेनेचे विशाल ठोमके,असिफ शेख,अनिलकुमार पारेख,गोपाळ बामणे,अविनाश माने,महाराष्ट्र सैनिक सुनील कवाळे,वैभव कोळी,राकेश कोळी,सुभाष ऐनापुरे,अक्षय सुतार,शेखर कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा