Breaking

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

कोर्टात नेताना संशयित आरोपींचा चेहरा काळ्या कपड्याने का झाकलेला असतो ?

  

संग्रहित छायाचित्र


     तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, कोर्टात ओरोपींना घेऊन येताना त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले असतात. परंतु असे का केले जाते ? असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार.  तर आज आम्ही तुम्हाला यामागील कारण सांगणार आहोत.


चेहरा झाकण्यामागचं कारण काय?

     आरोपीला न्यायालयात नेत असताना चेहरा झाकण्यामागे एक मोठं कारण असतं ते म्हणजे त्या व्यक्ती वरती न्यायालयात अजुन गुन्हा सिद्घ झालेला नसतो. आणि जोपर्यंत न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती गुन्हेगार असत नाही. यामुळे कोणालाही आरोपीचा चेहरा पाहता न यावा यासाठी त्याचा चेहरा शक्यतो काळ्या कापडाने किंवा इतर कापडाने झाकला जातो.

     जोपर्यंत न्यायालय आरोपीला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो. म्हणूनच तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवू नये आणि आरोपासाठी त्याची बदनामी करू नये.

    पत्रकारांनीही या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की, जोपर्यंत त्या व्यक्तिवरील आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीचा उल्लेख आरोपी असं न करता संशयित आरोपी असा करावा. व त्या व्यक्तीबद्दल कोणतीही खाजगी माहिती प्रसारित करू नये.


     जर त्या व्यक्तीचा चेहरा प्रसारित केला आणि न्यायालयाने त्या व्यक्तीला निर्दोष मुक्त केले तर त्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

      मीडिया देखील अनेक न्यायालयीन प्रकरणे कव्हर करते. अशा स्थितीत आरोपीचे फोटो आणि व्हिडीओ समोर येतात. मात्र तोंडावर कापड झाकले असल्याने आरोपीची बदनामी होत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा