*करण व्हावळ : विशेष प्रतिनिधी*
शिवसेना नेत्याला आलेल्या ईडीच्या नोटीस वरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. मात्र आता ईडीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याचे चित्र समोर येत आहे.शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना 'ईडी' कडून समन्स मिळाल्याच्या बातमीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 'दिल्लीवरून मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता.
यात ते म्हणाले होते, तुमच्याविरुद्ध ईडीमध्ये तक्रार आली असून आम्ही पुढील कारवाई करत आहोत. त्यानुसार तुम्हाला नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे. जर पुढील कारवाई टाळायची असल्यास दिल्लीला येऊन सेटलमेंट करू शकता. मात्र ही कॉपी नकली असून आपल्याला अध्याप अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे ते सांगत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा