Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*अब्दुललाट येथे विवाहित महिलेच्या चेहऱ्यावर फेकले अँसिड; महिला गंभीरित्या जखमी : संशयितांने केलं पलायन*

 

अब्दुललाट येथे विवाहितेवर ॲसिड हल्ला


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


   अब्दुललाट :  येथील घटना भर रस्त्यात महिलेच्या चेहऱ्यावर फेकला अँसिड महिला गंभीर जखमी झाली असून चेहरा पूर्णपणे भाजला आहे. तिची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

      या प्रकरणी पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र जोशिलकर वय वर्ष ५४ या संशयितास ताब्यात घेतले आहे. अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिला ही हातकणंगले  येथील एका शिक्षण संस्थेत आया म्हणून काम करीत आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी बरोबर घरातून दुचाकीवरून इचलकरंजीला जाण्यासाठी बाहेर पडले. दुचाकीवरून काही अंतरावर गेल्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला वादानंतर संशयित आरोपीने रागाच्या भरात रस्त्यात गाडी थांबवून त्यांना सोबत आणलेल्या बाटलीतील अँसिड  तिच्या तोंडावर थेट फेकले. यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा केला त्या परिसरातील नागरिक जमा झाले यावेळी हल्लेखोरांनी त्यातून पळ काढला. यामध्ये ते गंभीर जखमी झाली असून तिला खासगी वाहनातून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र जोशिलकर या संशयितास ताब्यात घेतला आहे. या घटनेचा सखोल तपास कुरुंदवाड पोलीस प्रशासन करीत आहे. 

    अचानक भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे अब्दुललाट परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा